सावंतवाडीत दहिहंडी धुमधडाक्यात..!

Edited by: विनायक गावस
Published on: September 07, 2023 20:28 PM
views 131  views

सावंतवाडी : गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीकाल्यानिमित्त दहिहंडी उत्सव मोठ्या दणक्यात अन् धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. गोविंदा रे गोपाळाच्या जयघोषात गोविंदा मैदानात उतरले. अमेय तेंडोलकर मित्रमंडळाच्या गोविंदापथकाच्या माध्यमातून मानाची दहिहंडी फोडत सावंतवाडी शहरातील उर्वरित हंड्या फोडण्यासाठी प्रारंभ करण्यात आला. हा सोहळा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. 

संस्थानकालीन मुरलीधर मंदीर इथं धार्मिक कार्यक्रमासह आरती करण्यात आली. यानंतर मानाची दहिहंडी फोडत श्रीकृष्णाची मूर्ती बाजारपेठेतून विसर्जन स्थळी नेत असताना चौकाचौकातील दहिहंड्या फोडण्यात आल्या. मोठ्या जल्लोषात हे गोविंदा पहायला मिळाले.

यावेळी यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमेय तेंडोलकर, परशुराम चलवाडी, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, निशांत तोरसकर, विनायक ठाकुर, अँड. अतु्ल केसरकर, दिनेश जाधव, सनी जाधव, मयूर लाखे, अरूण घाडी, संदीप केसरकर, रोहित चव्हाण आदींसह अमेय तेंडोलकर मित्रमंडळाचे कार्यकर्ते, सावंतवाडीकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते