
सावंतवाडी : शालेय शिक्षण मंत्री पुरस्कृत युवा सेना सावंतवाडी यांच्या माध्यमातून यावर्षी तब्बल एक लाख एकवीस हजारांच्या दहीहंडीचा थरार सावंतवाडीकरांना अनुभवता येणार आहे. गोपाळकाल्याच्या पार्श्वभूमीवर २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून श्रीराम वाचन मंदिर समोर या दहीहंडीच आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडी उत्सवासाठी सर्वात जास्त व शिस्तबद्ध थर लावणाऱ्या गोविंदा पथकास रोख रक्कम १ लाख २१ हजार रुपयांचे पारीतोषीक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. तरी या दहीहंडी उत्सवास मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंत्री केसरकर मित्रमंडळ व युवा सेना यांच्यातर्फे करण्यात आले आहे.