
देवगड : दही काला उत्सव श्रीकृष्ण जन्माष्टमी,निमित्त देवगड जामसंडे येथे दहीहंडीचा थरार नागरिकांना पाहायला मिळाला. जामसंडे येथे बाल शिवाजी गोविंद पथकाने ७ थराची सलामी देऊन वाहवा मिळविली. देवगड शहरातील मुख्य मांजरेकर नाका या ठिकाणी उभारण्यात आलेल्या दहीहंडीचा शुभारंभ ज्येष्ठ उद्योगपती नंदकुमार शेठ घाटे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी लायन स्टार, चे प्रमुख प्रसाद मांजरेकर ,हेमंत करंगुटकर रोहित ढोके,दिग्विजय कोळबकर,सुधीर मांजरेकर नगरसेवक विशाल मांजरेकर त्याचबरोबर रामदास भुजबळ व अन्य सदस्य उपस्थित होते .
दहीहंडी उभारण्याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. देवगड शहरात प्रामुख्याने देवगड पोलीस ठाण्यात या ठिकाणी सार्वजनिक श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव तसेच जगतापवाडी येथील इनामदार यांच्या निवासस्थानी श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडी सोहळा देवगड किल्ला येथे हनुमान मंदिर या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा आणि दहीहंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. याही वर्षी नागरिकांनी मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला. देवगड शहरातील तारामुंबरी नाका , येथील फ्रेंड सर्कल दहीहंडी त्याचबरोबर मांजेकर नाका येथील लायन स्टार दहीहंडी, इंद्रधनू क्लब दहीहंडी देवगड एसटी स्टँड रीक्षा चालक मालक व्यावसायिक व व्यापारी बंधू दहीहंडी त्याचबरोबर कॉलेज नाका येथील दहीहंडी ही प्रमुख आकर्षण नागरिकांना पाहता आली. देवगड शहरात पारंपरिक रितिरिवाजा प्रमाणे देवगड पोलीस स्थानकातील भगवान श्रीकृष्ण च्या मूर्तीची विसर्जन मिरवणूक निघाल्यानंतर त्या परिसरातील मानाच्या दहीहंड्या देवगड पोलीस सानकाचे गोविंदा फोडतात व त्यानंतर देवगड शहरातील बहुतांशी दहीहंडी फोडण्याचा मान हा देवगड पोलीस ठाण्यातील गोविंदांना दिला जातो. इंद्रधनु क्लब, लायन स्टार रिक्षा चालक-मालक संघ व्यापारी बंधू यांच्या दहीहंडी ही सलामी देणारी दहीहंडी त्याचबरोबर देवगड बस स्थानक या ठिकाणी उभारण्यात येणारी दहीहंडी ही फोडण्याचा मान गेली कित्येक वर्ष देवगड पोलीस गोविंदा पथकाला दिला जातो . .याही वर्षी हा मान देवगड पोलीस पथकाला गोविंदा पथकाला देण्यात आला. काही दहीहंड्या नागरिकांना खास सलामी देणाऱ्या दहीहंडी म्हणून उभारण्यात येतात व त्यानंतर त्या दहीहंडी फोडण्याचा मान दिला जातो .
याही वर्षी अशा पद्धतीने दहीहंडी उभारण्यात आल्या होत्या ठिकठिकाणी डीजे तालावर युवा वर्ग गोविंदा गुलाल उधळत नृत्य करत होते .देवगड शहर बरोबर व तालुक्यातील अन्य भागात देखील दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.