दादा सारंग तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी बिनविरोध

Edited by: दिपेश परब
Published on: September 12, 2025 14:28 PM
views 106  views

वेंगुर्ला : दाभोली ग्रामपंचायत सभेमध्ये युवा सामाजिक कार्यकर्ते दादा सारंग यांची तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. 

यावेळी उपस्थित सरपंच उदय गोवेकर, उपसरपंच श्रीकृष्ण बांदवलकर, माझी उपसरपंच विद्यमान सदस्य एकनाथ राऊळ, सदस्य अवधूत राऊत, माजी पंचायत समिती सदस्य समाधान बांदवलकर, माजी सरपंच गुरुनाथ कांबळी,अमित दाभोलकर, विष्णू दाभोलकर, देवेंद्र राऊळ, भूषण दाभोलकर, पोलीस पाटील जनार्दन पेडणेकर, तलाठी वेतुरकर, ग्रामस्थ, कर्मचारी अधिव उपस्थित होते. या निवडीबद्दल जिल्हास्तरावर कौतुक होत आहे.