हनुमान जयंतीनिमित्त महिला बुवांची डबलबारी भजन !

तांबळडेग इथं आयोजन !
Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 23, 2024 10:27 AM
views 270  views

देवगड :  श्रीदेव विठ्ठल रखुमाई देवस्थान तांबळडेग येथे श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त दि १३ एप्रिल रोजी रात्रौ १० वा. बुवा योगिता नंदू पवार × (वर्दे कुडाळ ) बुवा साची मूळम (हुर्शी देवगड ) यांच्या आमने सामने डबलबारी भजनाचे आयोजन श्रीदेव विठ्ठल रखुमाई मंदिर, तांबळडेग मधलीवाडी सांस्कृतिक भवन येथे करण्यात आले आहे.

या डबलबारी भजनाला भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्रीदेव विठ्ठल रखुमाई मंदिर, तांबळडेग मधलीवाडी (रजि.) यांच्या वतीने करण्यात आले आहे.