
देवगड : देवगड तालुक्यात दाभोळे येथे प्रथमच (२५ यार्ड) मधील नाईट अंडर आर्म सर्कल क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रथम क्रमांक- भावई जंक्शन वरेरी ने पटकावत दाभोळे चॅम्पियन ट्रॉफीवर आपले नाव कोरले तर उपविजेता द्वितिय क्रमांक- मामा भाचे, देवगड यांनी पटकावला.
विजेता भावई जंक्शन वरेरी यांना रोख रक्कम १५०००/- व चषक देऊन गौरविण्यात आले तर उपविजेता मामा भाचे देवगड यांना रोख बक्षीस १०,००० व चषक देऊन गौरविण्यात आले.तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक महेश स्पोर्ट्स,दाभोळे यांना रोख रु तीन हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. चतुर्थ क्रमांक- दिर्बा रामेश्वर जामसंडे यांना रोख रु तीन हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. तसेच मालिकावीर संकेत सावंत, बेस्ट बॉलर जागृत जोशी, बेस्ट फलंदाज आप्पा गोरुले, यांना टी - शर्ट देण्यात आले.
देवगड मधील दाभोळे गावात तालुक्यात प्रथमच दाभोळे प्रिमीयर लीगचे नियोजन स्थानिक तरुणांनी केले होते. यावेळी साहिल मयेकर, अक्षय धुरी, हेमंत घाडी, विपीन कोंडुस्कर, योगेश घाडी, कौस्तुभ घाडी, राजा घाडी यांचे उत्तम नियोजन व स्थानिक सहकारी मित्र व ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.
यावेळी उपस्थित सरपंच अनुभवणे, मनसे तालुका अध्यक्ष संतोष मयेकर, रणजित मयेकर, अक्षय धुरी, शशी धुरी, बप्पा घाडी, बंड्या धुरी, रमेश घाडी, कृष्णा घाडी, साहिल मयेकर, राजु घाडी, गावातील सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते.सर्व देवगड मधील सहभागी संघाचे यावेळी मंडळाच्यावतीने आभार मानण्यात आले.