
वैभववाडी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळातर्फे सन २०२४ घेण्यात आलेल्या डी फार्मसी परीक्षेत डी. फार्मसी इन्स्टिट्यूट,सांगुळवाडी या महाविद्यालयाची भाग्यश्री वळंजू ही जिल्हयात प्रथम आली आहे.
श्री.अनगरसिध्द शिक्षण प्रसारक मंडळाचे सांगुळवाडी येथे डी फार्मसी महाविद्यालय आहे.या महाविद्यालच्या प्रथम वर्षाचा निकाल ९४.४४ टक्के लागला असून द्वितीय वर्षाचा निकाल ९६.९२ टक्के लागला आहे.प्रथम वर्षामध्ये तृप्ती काळे ७८ टक्के, प्रथम,आदिती लाड ७७.५० हिने द्वितीय, स्विटी राठोड हिने ७७.९०टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला, तसेच द्वितीय वर्षामध्ये भाग्यश्री वळंजू ८६.३६हिने प्रथम ,साक्षी साळसकर ८५.१५ हिने द्वितीय तर अमिषा चव्हाण हिने ८४.३६टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक प्राप्त केला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संचालक संदीप पाटील प्रशासकीय अधिकारी सुधाकर येवले प्राचार्य जीवन पाटील आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.