पावसाळ्या अगोदर रस्त्यालगतच्या धोकादायक फांद्या तोडा

रवी जाधव यांची मागणी
Edited by: विनायक गांवस
Published on: May 15, 2025 11:19 AM
views 45  views

सावंतवाडी : पावसाळ्या अगोदर रस्त्यालगतच्या धोकादायक झाडांच्या फांद्या तोडा अशी मागणी नगरपरिषद व बांधकाम विभागाला सामाजिक कार्यकर्ते रवी जाधव यांनी केली आहे.

पावसाळा अगदी जवळ आला आहे. वादळी पावसामुळे रस्त्यालगतची जीर्ण झालेली झाड किंवा त्याच्या फांद्या तात्काळ तोडून घ्यावेत असे आवाहन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्यावतीने केले आहे. वादळी पावसामुळे कित्येक वेळा झाडाच्या फांद्या रस्त्यावर किंवा घरावर पडून अपघात घडले आहेत. असा प्रसंग पुन्हा कोणावर येऊ नये याकरिता शासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी. शासनाला मदत कार्य करण्यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान आपल्या सोबत नेहमीप्रमाणेच असेल असे आवाहन केले आहे.