कणकवलीत साडीसेल साठी ग्राहक ताटकळत...?

Edited by: उमेश बुचडे
Published on: August 10, 2023 14:32 PM
views 1202  views

कणकवली : कोल्हापूर गांधीनगर येथील व्यापाऱ्याने अरविंद साडी सेंटरच्या नावाने लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालयात येथे  सेल सुरू केला आहे . पण काही स्थानिक व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याची कैफियत आमदार नितेश राणेंकडे कणकवलीतील व्यापाऱ्यांनी मांडली आमदारांनी त्या व्यवसायिकाला बोलून समज दिली.

कोल्हापूरातील त्या व्यापाऱ्याने आपला सेल बंद केला आहे. ऐन गणेश चतुर्थी सणाच्या तोंडावर साड्या, टॉवेल, उशी कव्हर, बेडशीट आदी साहित्याचा बिग सेल अरविंद साडी सेंटर च्या नावाने कोल्हापुरातील व्यापाऱ्याने सुरू केला होता. स्थानिक दुकानांपेक्षा स्वस्त दराने त्याच दर्जाची खरेदी करता येत असल्याने ग्राहकांची या सेल मध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली होती. आज हा अचानक सेल बंद झाल्याने बऱ्याच महिला येऊन या सेलच्या दारात उभ्या होता त्यांनी हा सेल का बंद आहे. येथे दरवेळी सेल येतो आम्हाला कमी किमतीत चांगल्या दर्जाच्या वस्तू मिळतात त्यामुळे हा सेल सुरू व्हावा अशी मागणी केली आहे. सध्याच्या परिस्थितीत  बरेच ग्राहक येऊन सेल बंद असल्याचे पाहून माघारी परतत आहेत.