संस्कारक्षम व्यक्तिमत्व विकास ही काळाची गरज- गुरुवर्य शंकर प्रभू

मुक्त विद्यापीठ-समंत्रक-विद्यार्थी परिचय सत्र कार्यक्रमात प्रतिपादन
Edited by: रुपेश पाटील
Published on: November 20, 2022 18:08 PM
views 226  views

सावंतवाडी : आजच्या आधुनिक काळात लहान मुलांपासून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व विकास हे गरजेचे आहे. परंतु फक्त व्यक्तिमत्व विकास पुरेसा नसून तर तो संस्कारक्षम व्यक्तिमत्व विकास ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन गुरुवर्य शंकर प्रभू यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या डॉ. जे. बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, सावंतवाडी अभ्यास केंद्राचे आर.पी.डी ज्युनिअर कॉलेजमधील सभागृहात आयोजित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या डॉ. जे. बी. नाईक आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेजच्या शैक्षणिक वर्ष 2022-23 चे विद्यापीठ-समंत्रक-विद्यार्थी परिचय सत्र कार्यक्रमात केले. तर कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते यशवंतरावंच्या प्रतिमेस हार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याच्या दिशेने वाटचाल करताना भारताचे भविष्य घडवताना प्राथमिकता ठरविणे महत्त्वाचे आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईल व आपला अभ्यास याची सांगड कशी घालावी त्याचे नियोजन करून वाटचाल करावे असे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आर.पी.डी. ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. जगदिश धोंड बोलत होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव, माजी मुख्याध्यापक गुरुवर्य श्री. व्ही. बी. नाईक यांनी या अभ्यास केंद्राचे लावलेले छोट्याशा रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर कसे झाले या संघर्षमय पार्श्वभूमीवर प्रकाश टाकून यांचे खरे शिल्पकार प्राध्यापक व विद्यार्थी प्रिय केंद्रसंयोजक तुषार वेंगुर्लेकर असे नमूद करून त्यांचे कौतुक केले. यावेळी प्रा.संतोष  पाथरवट व प्रा. नुतन सावंत-भोसले यांनी विद्यार्थ्यांना विषयांची ओळख करून दिली.

दुसऱ्या सत्रात स्पर्धा परीक्षांबाबत महेंद्र ॲकेडमी चे संचालक श्री महेन्द्र पेडणेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्रा. रणजित राऊळ,प्रा. सुभाष बांबुळकर, प्रा.जे.डी.पास्ते, प्रा. गांवकर, प्रा. राणे, प्राध्या. पल्लवी सुतार, राहुल भालेराव व तन्वी पिळणकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. नारायण परब यांनी केले.परिचय सत्रास  विद्यार्थ्यांनी उस्फुर्त उपस्थिती  व प्रतिसाद दाखविली.