
सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील सीटीस्कॅन मशिन मध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे. यामुळे दोन ते तीन दिवस ही सेवा बंद राहिल याची नोंद रूग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी घ्यावी असं आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ ज्ञानेश्वर ऐवळे यांनी केले आहे.
डॉ. ऐवळे म्हणाले, सीटीस्कॅन मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला असून संबंधित तंत्रज्ञानास याची माहिती दिली आहे. याचे काम करण्यात येत असून दोन ते तीन दिवसांत मशीन वापरास पूर्ववत होईल. तोवर ही सेवा बंद राहील याची नोंद घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे.