बापर्डेतील सीआरपी वृषाली नाईकधुरे यांचे निधन !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 10, 2024 11:04 AM
views 303  views

देवगड : बापर्डे गावातील बचत गटाच्या माध्यमातून सीआरपी (समूह संसाधन व्यक्ती) म्हणून कार्यरत असलेल्या वृषाली विनोद नाईकधुरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वृषाली विनोद नाईक धुरे यानी बापर्डे ग्रामपंचायतला संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान अंतर्गत राज्यस्तरीय बक्षीस मिळवण्यासाठी त्यांचे योगदान मोठे होते. 

अभियानाअंतर्गत गावातील साफसफाई तसेच इतर उपक्रमासाठी गावातील महिलांना एकत्र करण्यासाठी त्यांचे विशेष मेहनत घेतली होती. बचत गटाच्या माध्यमातुनही महिलांना सक्षम करण्यास त्यांची महत्त्वाची भुमिका होती ,अतिशय मनमिळावू ,मितभाषी असलेल्या वृषाली विनोद नाईक धुरे यांच्या दुःखद निधनाने गावावर शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात पती व मुलगी असा परीवार आहे .