
दोडामार्ग : तिलारी नदीच्या कुशीत वसलेल्या घोटगे श्री स्वयंभूधारेश्वर देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवारी उत्साहात पार पडला. गोवा कर्नाटक, महाराष्ट्र आदी भागातील भाविकांचा जनसागर उसळला होता. सकाळ पासून विविध धार्मिक कार्यक्रम व दुपारपारी देवींची ओटी भरण्यास माहेरवासिणींनी गावकरी आदी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.
जत्रोत्सवानिमित्त श्री स्वयंभु धारेश्वर देवाचे मंदिर विद्युत रोषणाईने सजविलेले होते. शुक्रवारी सकाळी विधिवत व धार्मिक कार्वक्रम अभिषेक करून विधिवत पूजा, आरती, विविध कार्यक्रम पार पडले. तर सायंकाळी देवींची ओटी गाऱ्हाणे घालणे कार्यक्रम सुरु होता.
नवसाला पावणारा हाकेला धावणारा घोटगे गावच्या श्री स्वयंभू धारेश्वर, सातेरी देकीवडे अनेक भाविकांनी साकडे करून नवस केले. तर गतवर्षी केलेले नवस ही फेडण्यात आले. रात्री देवाची आरती मीरवणुक पालखी काढण्यात आली. तर रात्रौ दशावातर नाट्य मंडळाचा पारंपरीक दशावतार नाट्य प्रयोग ही साजरा करण्यात आला.










