श्री क्षेत्र कुणकेश्‍वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Edited by: नागेश दुखंडे
Published on: August 21, 2023 19:15 PM
views 142  views

देवगड : कोकणची दक्षिण काशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या श्री.क्षेत्र कुणकेश्‍वर येथे श्रावण सोमवार निमित्त भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे.भाविक यात्रेकरूंच्या स्वागतासाठी देवस्थानसह पोलिस, प्रशासन सज्ज आहेत.सकाळी मंदिरात विधीवत पूजा होऊन भाविकांसाठी दर्शन सुरु झाले. पहिला श्रावण सोमवार श्री शिवाचा वार असल्याने व त्यासोबतच नागपंचमी देखील असल्याने दर्शनासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. चार श्रावण सोमवार कुणकेश्वर मंदिरात भाविक मोठ्या संख्येने येणार आहेत. व चौथ्या सोमवारी सांगता  होईल. यात्रेसाठी मंदिर तसेच भक्‍तनिवास परिसरात भाविकांसाठी दर्शन रांगेची व्यवस्था केलेली दिसत होती.


देवस्थानकडून भाविकांच्या दर्शनासाठी चोख व्यवस्था ठेवली आहे. दर्शन मार्गावर तसेच मंदिराच्या परिसरात मंडप घातला आहे. दर्शन मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. तसेच आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. भाविकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने पोलिसांनी यंत्रणा कार्यरत केली आहे.त्या दृष्टीने नियोजन केले आहे.समुद्रकिनारी भेळ, आईस्क्रिम विक्रेते तसेच हॉटेल आदी स्टॉल उभारले आहेत.

तसेच या श्रावणी सोमवार पासून श्री.क्षेत्र कुणकेश्वर मंदिरामध्ये वस्त्र संहिता (ड्रेस कोड)लागू करण्याचे कमिटीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. कुणकेश्वर मंदिरात पहिल्या श्रावणी सोमवारी भाविकांची गर्दी झाल्याचे दिसून येत आहे.

त्याच प्रमाणे श्रावणी सोमवार निमित्त भक्तांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने योग्य ते नियोजन करण्यात आले आहे.यावेळी माजी सरपंच गोविंद घाडी,संजय आचरेकर,संतोष वाळके,व्यवस्थापक रामदास तेजम,सुधाकर नानेरकर, आधी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष दिनेश धुवाळी यांनी नियोजन उत्तम रीतीने केले असल्याचे सांगितले.