तेरवण - मेढेतील नागनाथ मंदिरात भाविकांची गर्दी

Edited by:
Published on: February 26, 2025 18:06 PM
views 272  views

दोडामार्ग : पांडव कालीन जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे तेरवण-मेढे येथील श्री देव नागनाथ तीर्थ क्षेत्राला माहाशिवरात्री निमित्त भाविकांचा जनसागर उसळला होता. पहाटे 5 वाजल्या पासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. महाराष्ट्र गोवा कर्नाटक या तिन्ही राज्यातून भावीक मोठ्या उत्साहात याठीकाणी दर्शनासाठी आले होते.

दोडामार्ग तालुक्यात तिलारी कुशीत वसलेल्या आणि पांडवकालीन तीर्थक्षेत्र म्हणून प्रसंदीद्ध असलेल्या तेरवण मेढे येथील श्री देव नागनाथ मंदिरात बुधवारी महाशिव रात्री निमित्त हजारो भाविकांनी दर्शन घेतले. काल मंगळवारी रात्री महान नाट्य प्रयोग सादर झाला. तर बुधवारी पहाटे 5 वाजल्या पासून भाविकांनी श्री देव नागनाथाचे दर्शन घेतले. लहानांपासुन थोरा पर्यंत सर्वानी मंदिरात शेजारील पाण्याच्या तळीत स्नान करून अभिषेक केला व श्री देव नागनाथाचे दर्शन घेतले. 

देव नागनाथाच्या दर्शनासाठी स्थानिक देवस्थान समितीने नियोजन बद्ध सर्व नियोजन केले होते. सोनावल येथील शाळकरी मुलांना याठीकाणी येणारऱ्या भाविकांना नियमात रांगेत लावून घेणे, कोणाच्या काय समस्या असतील तर त्याचे निराकारण करण्यासाठी ही शाळकरी मुले याठीकाणी स्वयंसेवक म्हणून ठेवण्यात आली होती. सर्व भक्तांनी लाईन मध्ये देवाचे दर्शन घ्यावे असे वारंवार स्पीकर च्या माध्यमातून भाविकांना सूचित करण्यात येत होते. तसेच एसटी म्हमंडळच्या माध्यमातून तेरवण मेढे येथे देव नागनाथ तीर्थक्षेत्रात भाविकांना येण्यासाठी जादा एसटी बस फेऱ्या सोडण्यात आले होते. 

पोलिसांचा कडक बंदोबस्त 

दरम्यान, दोडामार्ग पोलीस निरीक्षक खोपडे यांचाशी बातचीत केळी असता ते म्हणाले की तेरवण मेढे येथील श्री देव नागनाथ मंदिरात कला मंगळवार पासून भाविकांनी दर्शनाला येण्यासाठी सुरवात केली. हजारोंच्या संख्येत याठीकाणी भाविक येत आहेत. येणाऱ्या भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास हाऊ नये किंवा वाहनांच्या बाबतीत ट्राफीकला अडथळा होऊ नये यासाठी ट्राफिक पोलीस तेच 15 पोलीस कर्मचारी तसेच होमगार्ड याठीकाणी बंदोबस्ता साठी तैनात करण्यात आले आहेत. कोणत्याही प्रकारची चोरी किंवा लहान मुलांना कोणताही त्रास होऊनये याचीही खबरदारी घेतली जातं आहे. अशा प्रकारे श्री देव नागनाथ तीर्थक्षेत्राला महाशिव रात्री निमित्त असा चोख बंदोबस्त करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक खोपडे यांनी सांगितले.

 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने व राजू निंबाळकर परिवारा तर्फे मंदिराच्या परिसरात भाविकांना थंड पेय वाटण्यात येत होते. दुपारची वेळ आणि गर्मीने त्रस्त झालेल्या भाविकांना कोकम सरबत देऊन थंड केले जातं होते. यावेळी जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी, रामदास मेस्त्री, मदन राणे, संदेश राणे, संदेश वरक, ओलवीन लोबो, सिद्धेश, सुमित गवस, विकी धरणे, व शिवसेनेचे सर्वच कार्यकर्ते उपस्तित होते. 

दरम्यान, देव नागनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना देवस्थान समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष  तसेच सचिव, व सर्वच सदस्य व त्याच गावचे राहिवाशी प्रवीण गवस हे सर्व भक्तानां आपल्या तऱ्हेने  दर्शनासाठी सहकार्य करत होते. तसेच मंदिराच्या गाभाऱ्यात व बाहेर कोण कोण कोणत्या पद्धतीने काम करत आहे यावर त्यांचीही निद्राणी होती. तसेच सध्या मंदिराच्या नूतन इमारतीचे काम सुरु आहे. आणि त्याला लागणारा आर्थिक खर्च दिवसांन दिवस कमी पडत आहे. त्यामुळे याठीकाणी येणाऱ्या भाविकांनी आपल्या खुशालीने मंदिरासाठी देणगी स्वरूपात सहकार्य करावें असे आवाहन ते करत होते.