
कुडाळ : व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेशिअल या कंपनीच्या वतीने कुडाळ एमआयडीसी मध्ये भव्य रोजगार मेळाव्याला जोरदार सुरूवात झाली. या मेळाव्यात सुद्धा नामवंत कंपन्या सहभागी होणार असून त्याद्वारे तरुणांना तत्काळ नोकरी देत युवकांना एक चांगलीच संधी उपलब्ध करून दिली आहे. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या.
या मेळाव्यास दुपारपासून सुरूवात झाली. युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे रोजगार उपलब्ध देण्यात आले. अलीकडेच सावंतवाडी येथे झालेल्या रोजगार मेळाव्याला सुद्धा फार चांगला प्रतिसाद लाभला होता आणि त्यात अनेक तरुणांना रोजगार मिळाला होता. व्हेरेनिंअम या कंपनीने तर तत्काळ 20 जणांना नोकरीची लेटर दिली होती. तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या व्हरेनियम क्लाउड लिमिटेड या कंपनीने कोकणात सावंतवाडीनंतर आज कुडाळात हा रोगार मेळावा घेतला. कुडाळ येथील मेळाव्यात मुंबई पुणे गोवा येथीलही कंपन्या दाखल झाल्या आहेत.