तळवडे येथे आढळली मगर ; वन विभागाकडून नैसर्गिक अधिवासात यशस्वी मुक्तता !

Edited by:
Published on: June 11, 2023 12:24 PM
views 94  views

सावंतवाडी : तळवडे गावातील मिरेस्तीवाडी येथे रमाकांत कुलकर्णी यांच्या घरच्या परिसरात आढळून आलेल्या मगरीची सावंतवाडी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वी सुटका करत तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.

तळवडे येथे मानवी वस्तीजवळ मगर आढळून येत असल्याबाबत वन विभागाला कळाले. त्यानुसार सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांचे नेतृत्वाखाली वन विभागाचे जलद बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. अंदाजे 6 फूट लांबीची मगर श्री. कुलकर्णी यांचे घराच्या परिसरात असल्याचे दिसून आली.ही मगर श्री. कुलकर्णी यांचा घरच्या जवळ असलेल्या होडावडा नदीतून अली असण्याची शक्यता दिसून आली. वन विभागाचे कर्मचारी रामचंद्र रेडकर यांनी तळवडे ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या शिताफीने  मगरीला यशस्वीरित्या पकडले. तद्नंतर ती मगर नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यासाठी सुदृढ असल्याने तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

ही मोहीम उपवनसंरक्षक सावंतवाडी एस. नवकिशोर रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनपाल विजय पांचाळ, वनरक्षक रमेश पाटील, प्रकाश रानगिरे, वनमजुर रामचंद्र रेडकर तळवडे यांनी राबविली. येथील रहिवासी शबाळा जाधव आणि इतर ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.