
कणकवली :
देवगड-निपाणी जाणाऱ्या रस्त्यालगत नांदगाव - धनगरवाडी येथे गोवा बनावटीच्या दारूची विक्री करत असताना आढळल्या प्रकरणी प्रफुल्ल सहदेव जठार (रा. शिरवली-देवगड) याला एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ७ हजार २०० रुपयांची दारू जप्त केली. ही कारवाई रविवारी दुपारी १.२५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. कारवाई एलसीबीचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, ज्ञानेश्वर तवटे, श्री. समजीसकर यांनी केली. कणकवली पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वर तवटे यांनी फिर्याद दिली आहे.











