
कणकवली : साळीस्ते येथे खुनी अवस्थेत सापडलेल्या 'त्या' मृतदेह प्रकरणी पोलिसांकडे महत्त्वाचे धागेद्वारे प्राप्त झाले आहेत. पोलिसांची दोन पथके सध्या बेंगलोर येथे आहेत. त्यातील एक पथक कणकवली पोलिसांचे असून दुसरे पथक एलसीबीचे आहे. कणकवली पोलिसांच्या पथकाने मयत श्रीनिवास रेड्डी यांच्या आईची भेट घेतली. रेड्डी यांची आई येत्या दोन दिवसात कणकवलीत दाखल होणार आहे. तर एलसीबीच्या पथकाला देखील आरोपींची बहुतांश माहिती प्राप्त झाली आहे. मात्र, याविषयी या दोन्ही पथकांनी कमालीची गुप्तता पाळली आहे. मात्र, येत्या दोन दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.










