नेपाळी कामगाराला ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

नाद येथील पत्नीच्या खून प्रकरणातील आरोपी
Edited by:
Published on: August 29, 2025 11:59 AM
views 211  views

देवगड : पत्नीच्या खून प्रकरणातील नेपाळी कामगाराला ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून नाद येथील पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी असलेल्या नाद येथे एका नेपाळी कामगाराने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा सुनीता (३६) खून केल्याची घटना २६ ऑगस्ट रोजी रात्री ८.३० वा. च्या सुमारास घडली होती यातील संशयित आरोपी पती. प्रेम बहादूर बिष्ट (३८, मूळ रा. नेपाळ, सध्या रा. बेब्याचा सडा) याला देवगड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. व गुरुवारी सकाळी देवगड न्यायालयासमोर हजर केले असता दि.३० ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.

ऐन गणेश चतुर्थी सणातच ही घटना घडल्याने देवगड तालुका हादरला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माहिती नाद येथील बागायतदार यशवंत रमेश सावंत यांची ‘बेब्याचा सडा’ येथे कलम बाग असून या कलम बागेत संशयित प्रेम बिष्ट व त्याची पत्नी मजुरीचे काम करीत होते. बागेतील खोलीमध्ये संशयिताचे कुटुंब वास्तव्यास होते. २६ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास संशयित प्रेम बिष्ट याचा पत्नीशी वाद झाला. या वादात संशयित प्रेम बिष्ट याने लाकडी दांड्याने पत्नीला मारहाण करून तिचा खून केला.या घटनेची माहिती त्याने फोनवरून मॅनेजर म्हणून कामाला असलेल्या मोहन नारायण मोरे यांना आपल्या हातून पत्नीचा खून झाल्याची माहिती दिली या संदर्भात देवगड पोलीस स्थानकात  फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच देवगड पोलीस निरीक्षक भरत धुमाळ घटना स्थळी दाखल होऊन संशयित आरोपीला ताब्यात घेऊन पंचनामा केला. यावेळी त्यांच्या सोबत यांच्या समवेत सहा पोलीस उपनिरीक्षक राजन जाधव पोलीस हवालदार आशिष कदम ,महेंद्र महाडिक,योगेश लगड,पोलीस कॉन्स्टेबल प्रसाद आचरेकर,दिपेश तांबे उपस्थित होते.संशयित आरोपी विरुद्ध बीएनएस १०३(१)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी देवगड न्यायालयासमोर आरोपीला हजर केले असता न्यायालयाने ३० ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.देवगड पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या कडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.