महिलेला शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न

Edited by:
Published on: August 25, 2025 11:19 AM
views 645  views

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील घोडगे गावात एका महिलाला शॉक देऊन मारण्याचा प्रयत्न झाल्याची खळबळजनक घटना  रविवारी रात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार लीना जोसेफ लॉन्ड्रिक्स (घोडगे, ख्रिश्चनवाडी) ही महिला घरात एकटीच राहत होती. रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने तिच्या घरावर चढून  काठीला तर बांधून शॉक देण्याचा प्रयत्न केला. या घटनेने गावात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

याबाबत कुडाळ पोलीस प्रशासनाला माहिती देण्यात आली असून ही घटना चोरीचे उद्देशाने केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत अज्ञात व्यक्तीचा श्वानपथक आणून तपास करण्याची मागणी केली जात आहे.