वैभववाडी गांगो मंदीरातील घंटा चोरीला

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: August 09, 2025 18:21 PM
views 345  views

वैभववाडी : तालुक्यात घंटा चोरीचे सत्र सुरूच आहे.शहरापासून काही अंतरावर असलेल्या श्री.देव गांगो मंदिरातील दोन घंटा आणि देवाचा टोप अज्ञात चोरट्यानी लंपास केला आहे .हा प्रकार आज स्थानिकांच्या निदर्शनास आला आहे.

तालुक्यात घंटा चोरीचे प्रकार वाढले आहेत. उपळे येथील श्री. देव सिध्देश्वर मंदिरातील दोनवेळा घंटा चोरट्यांनी चोरल्या. त्यानंतर कुसुर येथील एका मंदिरातील घंटा चोरीला गेल्या होत्या. या चोरीचा अजुनही शोध लागलेला नाही. दरम्यान, वैभववाडी येथे सांगुळवाडी मार्गावर गांगोचा माळ येथे असलेल्या श्री. देव गांगो मंदिरातील दोन घंटा आणि देवाचा टोप शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यानी चोरला आहे.

आज काही स्थानिक मंदिरात गेले असताना हा प्रकार निदर्शनास आला.त्यानतंर वाभवे वैभववाडी येथील ग्रामस्थांनी पोलीस स्थानकात जाऊन पोलीसांना चोरीची माहीती दिली. पोलीसांनी देखील घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मात्र, चोरीसंदर्भात सायकांळी उशिरापर्यत पोलीसांत तक्रार देण्यात आली नव्हती. चोरींच्या वाढत्या प्रकारामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.