
कणकवली : गोव्याहून मुंबईच्या दिशेने 'रॉंग साईड'ने व मद्यपान करून कंटेनर घेऊन जात असलेल्या अजयकुमार शिवबहादूर यादव (३२, रा. उत्तर प्रदेश) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. कोर्टाने त्याला सोमवारी १६ हजार २०० रुपयांचा दंड ठोठावला. ही कारवाई महामार्ग पोलीस केंद्र कसाल - कणकवली यांनी शनिवारी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास वागदे येथे केली होती.
गोव्याहून मुंबईच्या दिशेने 'रॉग साईड'ने कंटेनर घेऊन जात असलेल्या अजय कुमार शिवबहादूर यादव याला महामार्ग पोलीस केंद्र कसाल - कणकवलीच्या पोलिसांनी पाठलाग करून अडवले व त्यानंतर कणकवली पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पोलीस चौकशीत अजयकुमार हा मद्यपान करून असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दयानंद मिठबावकर यांनी केला.