
कणकवली : तालुक्यातील १७ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सदर मुलगी रात्री ११ वाजता जेवून झोपी गेली होती. मात्र, सकाळी ६ वाजता ती घरातून बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले. याबाबत मुलीच्या चुलत्याने कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुलीला कुणीतरी फुस लावून पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.