
मालवण : जमिनीच्या वारस तपासासाठी प्रत्येकी दोन हजार अशी दोन अर्जदारांकडून चार हजार रुपयांची मागणी करून ते स्वीकारत असताना तलाठी निलेश किसन दुधाळ वय 26 यांना अँटिक्रप्शन विभाग सिंधुदुर्ग पथकाने रंगेहात ताब्यात घेतले. दरम्यान, निलेश दुधाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक विजय पांचाळ यांच्यावतीने देण्यात आली.
निलेश दुधाळ हे मसुरे तलाठी म्हणून कार्यरत होते. दोन रहिवासी यांनी जमिनीचे वारस तपास करण्यासाठी एका व्यक्तीकडे सर्व कागदपत्रे दिली होती. त्यांनी तलाठी कार्यालयात ती सर्व कागदपत्रे जमा केली. सदर दोन्ही अर्ज काही दिवस प्रलंबित होते. याबाबत तलाठी यांना विचारणा केली असता प्रत्येक वारस तपास अर्जासाठी दोन हजार याप्रमाणे चार हजार रुपये मागणी केली.
दरम्यान, याबाबत तलाठ्यांची तक्रार अँटिक्रप्शन करपशन सिंधुदुर्ग कार्यालयाकडे करण्यात आली. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करून सापळा रचण्यात आला. यात निलेश किसन दुधाळ हे चार हजार रुपये घेताना रंगेहात पकडण्यात आले. त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. ही कारवाई अँटिक्रप्शन विभागा सिंधुदुर्ग पोलीस उप अधीक्षक विजय पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रीतम कदम, जनार्डन रेवंडकर, गोविंद तेली, विजय देसाई, अजित हंडे, स्वाती राऊळ, योगेश मुंडे यांच्या पथकाने ठाणे परीक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर, सुहास शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे.