शिवीगाळ करून मारहाण प्रकरण

गुन्हा दाखल
Edited by:
Published on: May 15, 2025 19:34 PM
views 45  views

देवगड : शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण केल्याप्रकरणी मुणगे - आडवळवाडी येथील  तीन संशयितांवर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहत्या घराच्या व जमीन जागेच्या कारणावरून मुणगे - आडवळवाडी येथील सुचिता संतोष बोरकर (४९) यांना शिवीगाळ करून लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तेथील विलास शिवराम बोरकर (६०), वैष्णवी विलास बोरकर (२३), पवन विलास बोरकर (२६) या संशयितांविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ वा. च्या सुमारास घडली.

पोलिसांन कडून मिळालेल्या माहितीच्या आधारे फिर्यादी सुचिता बोरकर व संशयित विलास बोरकर यांचे राहत्या घराच्या व जमीन जागेच्या कारणावरून वाद आहेत. मंगळवारी सायंकाळी ६ वा. च्या सुमारास फिर्यादी सुचिता बोरकर या भांडी धुवत असताना संशयित वैष्णवी बोरकर ही तेथे लाकडी दांडा घेऊन आली व तिने सुचिता यांच्या डाव्या कानाजवळ व डाव्या हाताच्या मनगटावर दांड्याने मारून दुखापत केली. संशयित विलास बोरकर याने सुचिता यांच्या कानाखाली मारले. तर संशयित पवन बोरकर याने सुचिता यांच्या कमरेवर लाथ मारून हाताच्या थापटाने मारून दुखापत केली. तसेच शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. याबाबतची फिर्याद सुचिता बोरकर यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे.या फिर्यादीनुसार तीनही संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२) (३), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.देवगडचे प्रभारी पोलीस अधिकारी मनोज सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. गावडे करीत आहेत.या घटनेचा अधिक तपास करत आहेत.