
सावंतवाडी : ओसरगाव येथील जळालेल्या स्थितीत असलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे. हा मृतदेह सावंतवाडी तालुक्यातील किनळे, वरची वाडी येथील चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या सुचिता सुभाष सोपटे हिचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती मिळतेय. तसेच तिला ठार मारून आणि जाळून टाकणारा संशयीत आरोपीच्या मुसक्या आवळण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग यांना यश आले आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून आज शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने आंबोली बेळगाव मार्गावरून गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले असून तो वेंगुर्ले तालुक्यातील असल्याचे पुढे आले आहे. कर्ज बाजारी असल्यानेच त्याने या महिलेचा काटा काढला असून पहिल्यांदा गाडीतील टाॅमीने डोक्यावर घाव घालून मारले आणि तिला ओसरगाव येथे पेट्रोल ओतून जाळण्यात आल्याचे पोलिस तपासात पुढे आल्याची माहिती मिळतेय.