चोरांची हिम्मत पहा | भर दिवसा घरात घुसून वृद्ध दाम्पत्याला लुटलं

Edited by:
Published on: December 23, 2024 18:07 PM
views 616  views

मालवण : वायंगणी येथे मोटारसायकल वरुन आलेल्या दोन अज्ञात इसमांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापक दामोदर साळकर (वय ७७) आणि त्यांची पत्नी सुप्रिया साळकर (वय ७०) यांच्या घरात घुसून त्यांच्या अंगावरील सोन्याचा ऐवच चोरून नेण्याची घटना सोमवारी सकाळी साडेन नऊ च्या सुमारास वायंगणी देवूळवाडी येथे घडली.याबाबत घटनास्थळी आचरा पोलीस दाखल झाले होते.

दामोदर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपण सकाळी तुलशीवृदांवनास अगरबत्ती लावून घरात येत असताना आलेल्या दोन अज्ञात इसमांनी सुपारी मागण्याचा बहाना करत घरात घुसले.त्यांनी दामोदर साळकर यांचे रुमालाने तोंड बांधण्याचा प्रयत्न केला. यामुळे हे चोरटे असल्याचा संशय आल्याने साळकर यांनी ओरड मारण्याचा प्रयत्न केला.यावेळी चोरट्यांनी साळकर यांच्या गळ्यातील तीन चैनी मागून ओढून पळ काढला त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर व गळ्याला जखम झाली ‌तर दुसरया चोरट्यांने सुप्रिया दामोदर साळकर यांच्या गळयातील मंगळसूत्र ओढून पळ काढला. मंगळसूत्र व तीन चैनी मिळून साळकर यांचे सुमारे
पाच तोळ्याचे ऐवज चोरट्यांनी लंपास करत पोबारा केला असल्याचे साळकर यांनी सांगितले.सदर चोरटे हे काळ्या स्प्लेंडर वरुन आल्याचे व एक जाडा आणि एक कडकोळ शरीर यष्टीचे असल्याचे त्यांना पाहिलेल्या वायंगणी येथील बापु सावंत यांनी सांगितले. चोरीची मिहिती मिळताच आचरा पोलीस स्टेशनचे प्रभारी स. पो. निरिक्षक सागर खंडागळे, पोलीस कर्मचारी मिनाक्षी देसाई, सुदेश तांबे, महिला पोलीस तांबे, मनोज पुजारे यांसह सरपंच रुपेश पाटकर, सदा राणे,चंदू सावंत,सचिन रेडकर यांसह अन्य ग्रामस्थांनी धाव घेतली होती.