
देवगड : घरी परतणाऱ्या युवतीची छेडछाड, विनयभंग करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल असलेल्या सहा संशयित यापैकी शासकीय सेवेत कार्यरत होते. यातील संशयित हे शासनाच्या विविध खात्यात कार्यरत होते. यातील संशयित हरिनाम गीते व प्रवीण रानडे हा महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहे. संशयित माधव केंद्रे हा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) विभागात कार्यरत आहे. संशयित सटवा केंद्रे हा राज्य राखीव पोलीस बल गट ८ मुंबई गोरेगाव येथे पोलीस नाईक पदावर कार्यरत आहे. श्याम गीते हा नांदेड एसटी महामंडळात चालक म्हणून कार्यरत आहे.संशयित शंकर गीते हाबृहन्मुंबईमहानगरपालिकेतंर्गत भायखळा मुंबई येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे.