
दोडामार्ग : दोडामार्ग वरची धाटवाडी येथील चंद्रहास कर्पे यांच्या घरात सोन्याच्या दागीन्यांची चोरी घडल्याची घटना आज घडली आहे. त्यांच्या कपाटातील दागिने चोरिला गेले आहेत. तर त्यातील काही दागिने दुसऱ्या खोलीत टाकल्याचे उघडकीस आले आहे. आज गुरुवारी आलेले श्वान पथक घरातच गुदमरून राहिले. तर ठशे तज्ञांना कपाटावर ठशे आढळून आले आहेत.
याबाबत अधिक माहिती आशिकी दोडामार्ग वरची धाटवाडी येथे बुधवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराचे कुलुप चावीच्या सहाय्याने काढून घरात शिरला व खोलीतील खाटवरील गादीच्या खाली ठेवलेली कपाटाची चावी घेत कपाट उघडून कपाटातील सोन्याचा हार, चैन चोरली व त्यातील काही दागिने म्हणजे हातातील बांगडी, कानातील कुडी, चैन असे काही दागिने दुसऱ्या लागतच्या खोलीत खाटच्या बाजूला टाकल्याचे निदर्शनास आले. यानंतर चंद्रहास कर्पे यांनी दोडामार्ग पोलिसांत तक्रार दिली त्यानंतर पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी सर्व यंत्रणा तात्काळ हलवून श्वान पथक, व ठशे तन्य टीम बोलून सर्व पुरावे हाती घेतले आहेत. यावेळी घटना स्थळी आलेले श्वान पथक घरात झालेल्या चोरीच्या ठिकाणी झाडा झडती घेतली परंतु श्वान घरातच घुटमळत राहिले. यावेळी श्वान पथकाचे अधिकारी, ठशे तज्ञ अधिकारी आणि दोडामार्ग पोलीस उपस्थित होते. अधिक तपास दोडामार्ग पोलीस करीत आहेत.