देवगडमध्ये ईस्टाेअर कंपनीकडून गुंतवणुकदारांची 26 लाखांची फसवणूक

Edited by: नागेश दुखंडे
Published on: April 15, 2024 06:10 AM
views 290  views

देवगड : देवगडमध्ये इस्टाेअर कंपनीच्या चार संचालकांसह सात एजंटांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून या कारवाईने देवगडमध्ये खळबळ उडाली आहे.ईस्टाेअर कंपनीमध्ये गुंतवणुकदारांना भरघाेस परताव्यातुन फायदा असल्याचा तसेच चांगल्या परताव्याचे आमिष दाखवुन वेगवेगळ्या स्कीमद्वारे रक्कम राेख स्वरूपात तसेच बँकींगद्वारे गुंतवणुकदारांकडून घेवून गुंतवणुकदार लाेकांची सुमारे २६ लाख १४ हजार २१० रूपये रकमेची आर्थिक फसवणुक करून अपहार केल्याप्रकरणी देवगड पाेलिसांनी ही कारवाई केली आहे.ही घटना दि. १७ ऑक्टाेबर २०२० ते दि. ३० जुन २०२२ या कालावधीत घडली.या घटनेने देवगड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली येथील फैजान खान, शमशाद अहमद, गुरू द अली खान आणि मुकेश तेली यांनी ई-स्टाेअर मधील वेदिक आयुरकेअर प्रा.लि.नावाची कंपनी स्थापन करून या कंपनीचे सिंधुदूर्ग जिल्ह्यात मुख्य एजंट म्हणून देवीदास बाळकृष्ण खवळे रा.देवगड तारामुंबरी,अनिल काशीराम जाधव(मुंबई), संजना परांजपे(पनवेल), शैलेंद्र बाबुराव पेडणेकर(सावंतवाडी), राैनक पटेल(कणकवली), सचिन सावंत(कुडाळ), किरण कदम(कुडाळ नारूर) या एजंटद्वारे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील विविध भागात तसेच देवगड येथील मध्यवर्ती भागात एका गाळ्यामध्ये मुख्य एजंट देवीदास परब यांनी ई स्टाेअर मधील वेदिका आयुर केअर नावाचे कंपनीचे कार्यालय उघडून गुंतवणुकदार लाेकांना ई स्टाेअर मधील वेदिका कंपनीची ग्राेसरी, हेल्थ फॅमिली पॅकेज, वेदा पाॅईट, वेदा माल्ट, मल्टीपल फॅमिली पॅकेज या नावाच्या पॅकेजवर भरघाेस परतावा व फायदा असल्याचे तसेच चांगल्या परताव्याचे आमिष दाखवुन त्याकरीता वेगवेगळ्या स्कीमद्वारे रक्कम राेख तसेच बॅकींगद्वारे गुंतवणुकदारांकडून स्विकारून एकूण ५४ गुंतवणुकदारांना कंपनीचा आयडी नंबर देवून त्यांनी दिलेल्या स्कीममधील आश्वासने प्रमाणे परतावा रक्कमा मुदत संपुन सुध्दा परत न करता त्या रक्कमा स्वत:चा फायद्यासाठी वापरून गुंतवणुकदार लाेकांचा एकुण २६ लाख १४ हजार २१० रूपये रकमेचा आर्थिक अपहार केलेला आहे.तसेच ईस्टाेअरमधील वेदीक आयुरकेअरचे मुख्य संचालक व एजंट यांनी देवगड परिसरातील तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गुंतवणुकदार लाेकांची अशाचप्रकारे माेठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुक करून रकमेचा अपहार केला आहे अशी तक्रार तारामुंबरी

येथील चैतन्या चेतन तारकर(३१) यांनी दिली असून या तक्रारीवरून देवगड पाेलिसांनी या कंपनीचे मुख्य संचालक फैजान खान, शमशाद अहमद, गुरू द अली खान आणि मुकेश तेली रा.दिल्ली व मुख्य एजंट अनिल काशीराम जाधव, संजना परांजपे, शैलेंद्र बाबुराव पेडणेकर, राैनक पटेल, सचिन सावंत, किरण कदम, देवीदास बाळकृष्ण खवळे यांच्याविरूध्द ४३०,४०६,४६५,४६७,४६८,४७१,३४,प्रमाणे तसेच महाराष्ट— ठेवीदारांच्या(वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण)अधिनियम १९९९-३ याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.तपास पाेलिस निरिक्षक अरूण देवकर करीत आहेत.