अल्पवयीन मुलीवर तरुणाकडून अत्याचार

पोक्सोंर्तगत गुन्हा दाखल
Edited by:
Published on: April 13, 2024 09:41 AM
views 629  views

वैभववाडी : तालुक्यातील एका गावातील सतरा वर्षीय मुलीवर तिच्याच प्रियकरांने अत्याचार केला. या प्रकरणी पोलीसांनी तीस वर्षीय तरूणावर पोक्सोतर्गंत गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यातील एका गावातील एका मुलीचे गावालगतच असलेल्या एका तरूणांशी तीन वर्षापुर्वी प्रेमसबंध जुळले.गेली तीन वर्षे या दोघांचे प्रेम प्रकरण सुरू होते.परंतु यामध्ये त्या  तरूणाने केवळ प्रेमाचे नाटक केले होते.प्रेमाचा दिखावा करून त्या तरूणीवर तिच्या मनाविरोधात वारंवार अत्याचार केला.तसेच तिचे अश्लील व्हिडीओ देखील तयार केले.त्याच व्हीडोओचा धाक दाखवुन तो त्या तरूणीवर अत्यावर करीत होता.अलीकडे तो वारंवांर तिला त्रास देत होता.अखेर त्या तरूणीने आज ता.१३ येथील पोलीस स्थानकात येत त्या तरूणाविरोधात तक्रार दिली.पोलीसांनी तातडीने त्या तरूणाविरोधात पोक्सोतर्गंत गुन्हा दाखल केला असुन त्याला ताब्यात घेतले आहे.या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस कॉन्स्टेंबल तनया तावडे या करीत आहेत.