CRIME | व्हेल मासा उलटीसदृश्य पदार्थाचे तुकडे जप्त

नऊ जण ताब्यात | चौकशी सुरू
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: March 18, 2023 09:09 AM
views 215  views

मालवण : मालवण वेरळ माळरानावर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने २४ किलो २६४ ग्रॅम वजनाच्या व्हेल मासा उलटीसदृश पदार्थाचे तुकडे शुक्रवारी सायंकाळी जप्त केले. एका खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल आणि अप्पर पोलीस अधिक्षक नितीन बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभगाने ही कारवाई केली आहे. 

या प्रकरणी नऊ संशयीतांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचेकडे चौकशी सुरू आहे. या कारवाईत दोन चारचाकी आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी या घटेनची माहिती वन विभागाला दिली आहे. पुढील कारवाई सुरू आहे. मात्र या घटनेने खळबळ उडाली आहे