नीरज देसाई, जीवन रेगे यांची क्रेडाई महाराष्ट्रच्या कार्यकारणीवर निवड

Edited by: विनायक गांवस
Published on: April 06, 2023 22:57 PM
views 155  views

सावंतवाडी : कॉन्फेडरेशन ऑफ़ रियल एस्टेट असोसियेशन ऑफ़ इंडिया म्हणजेच क्रेडाई हि देशपातळीवर काम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची संघटना आहे. या संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे काम क्रेडाई महाराष्ट्र करते. नुकतीच या संघटनेची सन 2023-25 साठी राज्य कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या मध्ये क्रेडाई सावंतवाडीचे अध्यक्ष नीरज देसाई यांची डिजिटल ,ई बुलेटिन आणि वर्कशॉप य़ा कमिटीवर आणि क्रेडाई सिंधुदुर्गचे जीवन रेगे यांची ट्रेनिंग ,वर्कशॉप आणि सेमिनार या कमिटीवर निवड करण्यात आली. सलग दुसऱ्यांदा सिंधुदुर्गचे बांधकाम व्यावसायिकांना राज्य पातळीवर नेत्रुत्व करण्याची संधी मिळणार आहे. य़ा पूर्वी नीरज देसाई याना सन 2021-23 करिता क्रेडाई स्ट्रेंदनिंग आणि एक्सपान्शन या कमिटीवर काम करण्याची संधी मिळाली होती.

    या निवडीबद्दल क्रेडाई सावंतवाडी आणि क्रेडाई सिंधुदुर्गच्या सर्व सदस्यांनतर्फे नीरज देसाई आणि जीवन रेगे यांचे अभिनंदन करण्यात आले.यावेळी बोलताना नीरज देसाई यांनी आपल्यां निवडीबद्दल क्रेडाई महाराष्ट्रचे विशेष आभार मानले आणि असेच आपल्या जिल्ह्यातील बांधकाम व्यावसाईकांचे शासनस्तरावरील प्रश्न क्रेडाई महाराष्ट्राच्या माध्यमातून सोडविण्यासाठी आणि त्यावर त्याना योग्य ते मार्गदर्शन करण्यासाठी आपण कायम उपलब्ध असल्याची ग्वाही दिली.