सांडपाण्याच्या व्यवस्थापनाकरिता शोषखड्डे निर्माण करा : वृक्षाली यादव

Edited by:
Published on: January 05, 2025 20:09 PM
views 406  views

देवगड : सांडपाण्याच्या व्यवस्थापनाकरिता कुटूबास्तरावर  वैयक्तिक शोषखड्डे निर्माण होण्यासाठी देवगडमध्ये  विशेष मोहिम राबवण्यात येणार असुन या मोहिमेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन  गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांनी केले. शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या मार्गदर्शनाप्रमाणे मनरेगा योजनेतुन मॅजिक पिट , साधा शोषखड्डे   कुटुंबस्तरावर तयार  करून त्या सांडपाण्याच्या व्यवस्थापन त्याच कुटुंबाने करावयाचे आहे . शोष खड्डयांच्या निर्मितीमुळे भुर्गभातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे .

सदरच्या विशेष योजनेमध्ये मनरेगातील कर्मचारी तसेच पाणी व स्वच्छता कर्मचारी यांच्या वतीने सदर मोहिम उत्कृष्ट पणे राबवली जाईल याकरीता सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सुचना गटविकास अधिकारी देवगड वृक्षाली यादव यांनी दिल्या. या मोहिमेत उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा  विशेष सन्मान पंचायत समिती देवगड मार्फत होणार असुन या मोहिमेत नागरीकांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन ग्रामपंचायतींमध्ये संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे .