मनसेच्या झेंड्याखाली काम करणारा युवावर्ग निर्माण करा! - मनसे राज्य सरचिटणीस संदीप दळवी

कोंडुरा येथे मनसे कार्यकर्त्यांच्या मेळावा संपन्न
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: January 19, 2023 17:30 PM
views 138  views

सावंतवाडी : 'गाव तेथे मनसे शाखा' या अभियाना अंतर्गत पुढील काळात मनसेच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येवून पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मनसेचे राज्य सरचिटणीस संदीप दळवी यांनी केले. कोंडुरा येथे आयोजित करण्यात आलेल्या मनसेच्या सावंवाडी विधानसभा मतदासंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

प्रत्येक गावात मनसेच्या झेंड्याखाली काम करण्यासाठी तयार असलेला युवा वर्ग निर्माण करा, त्यासाठी आवश्यक असलेले सर्व सहकार्य पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला दिले जाईल अशी ग्वाही देखील यावेळी व्यासपीठावर असलेल्या मान्यवरांनी दिली.

 यावेळी मनसे पक्षाच्या माध्यमातून जे ग्रामंपचायत निवडणूकीत निवडून आलेले व पराभूत झालेत असे मनसे सदस्य, सरपंचांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला. यावेळी या मेळाव्याला मनसेचे कामगार सेना राज्य सरचिटणीस गजानन राणे, महिला राज्य उपाध्यक्ष अनिषा माजगावकर, राज्य उपाध्यक्ष योगेश सावंत, विद्यार्थी सेना संपर्क अध्यक्ष अमोल साळुंखे, माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब, माजी उपजिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, महेश परब, सुधीर राऊळ, राजू कासकर, आशिष सुभेदार, अमित नाईक, सुनील गवस, सनी बागकर, गुरुदास गवंडे, काशिराम गावडे, अतुल केसरकर, राकेश परब, अजित पोळजी, अक्षय पार्सेकर, आदेश सावंत, मिलिंद सावंत, मंदार नाईक, साईल तळकटकर, संदीप राऊळ, सचिन पांगम, केतन सावंत व अन्य पदाधिकरी कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसन्गी अनेक तरुणांनी मनसेत जाहीर प्रवेश केला आणि हाॅलचा परिसर मनसेच्या घोषणांनी दणाणून टाकला. या सर्वांचे स्वागत संदीप दळवी यांच्या हस्ते करण्यात आले.