कारचा धडकेत गायीचा मृत्यू

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 22, 2023 14:47 PM
views 301  views

सिंधुदुर्ग : मुंबई - गोवा महामार्गावर अणाव वाडी हूमरमळा येथे इको कारच्या धडकेत गाईचा जागीच मृत्यू झाला आहे, तर वासरू जखमी झाले आहे.

मुंबई गोवा महामार्गा वरून तरळा वरून कुडाळच्या दिशेने प्रवास करत असताना गाय व वासरू अचानक समोर आल्याने इको कारची धडक गायला बसली असता गाय जागीच मृत्यूमुखी पडली. तर गायीचे वासरू जखमी झाले आहे. तर याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.