
सिंधुदुर्गनगरी : समाज कल्याण विभागाच्यावतीने वाटप केलेल्या लोखंडी डेस्क बेंच निधीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असा आरोप करत सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्यासह कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, कनैया पारकर, मंगेश लोके, अल्पसंख्यांक मागासवर्गीय सेल जिल्हाध्यक्ष संदीप कदम, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख आदि उपस्थित होते.