जिल्हास्तरीय भव्य भरडधान्य पाककला स्पर्धा !

Edited by: देवयानी वरसकर
Published on: February 08, 2024 09:51 AM
views 77  views

सिंधुदुर्गनगरी  : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या 350 व्या वर्षानिमित्ताने १५ ते १९ फेब्रुवारी  या कालावधीत माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिजामाता संकुल ओरोस येथे ‘आनंदोत्सव’ साजरा करतय. श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान,  कृषी विज्ञान केंद्र, सरस्वती एज्युकेशन सोसायटी, छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, जिजामाता फळ प्रक्रिया समूह व सैनिक फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा ‘आनंदोत्सव’ साजरा करण्यात येणार आहे.

आनंदोत्सव कार्यक्रमात नैसर्गिक शेती, आरोग्य, उद्योग, स्वच्छता, क्रीडा, पर्यावरण विषयी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच तीन दिवसीय भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले असून जागतिक कीर्तीचे अणुशास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचे सुभ हस्ते आनंदोत्सवाचे उदघाटन होणार आहे. या आनंदोत्सवामध्ये  १७ फेब्रुवारी २०२४ रोजी भरड धान्य पाककला स्पर्धा सकाळी ठीक ९.३० वा. आयोजित करण्यात आली आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी दि. ११ फेब्रुवारी २०२४ पर्यंत साय. ७.०० वाजेपर्यंत आपली नाव नोंदणी करावी. 


संपर्क: प्रा. भावना पाताडे – ९४२१२६२३२१


भरडधान्य पाककला स्पर्धेची नियमावली-

1. प्रत्येक स्पर्धकाने कोणताही एक पदार्थ करून आणावा.

2. पदार्थामध्ये प्रामुख्याने भरडधान्याचा ज्वारी, नाचणी, बाजरी, वरी, सावा,  हरिक, कोदो) समावेश असणे

    गरजेचे आहे. 

3. पदार्थ आपण का बनवला आहे याची माहिती असणे आवश्यक आहे

4. आपल्या इच्छेप्रमाणे आपण पदार्थ सजावट करणे अपेक्षित आहे.

5. भरड धान्याचे आहारामध्ये असलेले महत्त्व स्पर्धकाला सांगता येणं अपेक्षित आहे

6. पदार्थ सोबत पाणी, चमचा आणि टिशू पेपर असणे आवश्यक आहे.

7. पदार्थाची कृती परीक्षकांना सांगणे गरजेचे आहे. असे योगेश पेडणेकर प्राचार्य, छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस – ओरोस यांनी जाहीर केले आहे.