बाहुबली धबधब्याच उद्घाटनाआधी वादाची ठिणगी

मंत्र्यांआधी केला पारपोली ग्रामस्थांनी शुभारंभ
Edited by: विनायक गावस
Published on: August 12, 2023 17:56 PM
views 944  views

सावंतवाडी : आंबोली येथील बाहुबली धबधब्याच आज पर्यटन मंत्री गिरीश महाजन, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार होत. परंतु, पारपोली ग्रामपंचायत भागात बाहुबली धबधबा येऊन देखिल ग्रामपंचायतीला या उद्घाटनाच आमंत्रण दिलं नाही. तरी देखील पारपोली ग्रामस्थांनी लावलेला स्वागताचा बॅनर आंबोली सरपंचांच्यावतीन फाडण्यात आला असा आरोप करत मंत्र्यांनी शुभारंभ करण्याआधी पारपोली सरपंच, उपसरपंचांसह ग्रामस्थांनी केला. 

पारपोली ग्रामस्थांच्यावतीन नारळ फोडत या धबधब्याचा शुभारंभ करण्यात आला. पारपोली ग्रामपंचायतच्या हद्दीत हा धबधबा येत असताना ग्रामपंचायतीला विश्वासात घेतलं नाही. तरी देखील पारपोली ग्रामस्थांनी लावलेला स्वागताचा बॅनर फाडल्यान मंत्र्यांच्या आदी श्रीफळ फोडत निषेध नोंदविण्यात आला. 

यावेळी पारपोली सरपंच कृष्णा नाईक, उपसरपंच संदेश गुरव, सदस्य प्रियांका गुरव, माजी उपसरपंच प्रमोद परब, हेमंत गावकर, दत्ताराम गांवकर, दिपक पास्ते, विनायक गांवकर, सोपान परब आदी उपस्थित होते.