
मालवण : जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळत आहे. यामुळे महावितरणचे विद्युत खांब पडणे, वीज वाहिन्यांवर झाडाच्या फांद्या पडून वीज पुरवठा खंडित होत आहे. अशा वेळी ग्राहकांना वीज पुरवठ्या बाबत वेळेत व अचूक मिळावी म्हणून महावितरणने कुडाळ येथे नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. जिल्ह्यातील वीज ग्राहक आपत्कालीन कक्षाच्या 7875765019 या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. ग्राहक सेवेत हा क्रमांक चोवीस तास सुरु असणार आहे अशी माहिती वीज वितरण कडून देण्यात आली आहे.
टोल फ्री क्रमांकावर ही करता येते तक्रार :
विजेसंबंधीच्या सर्व तक्रारींचा निपटारा करण्यासाठी १८००२३३३४३५ व १८००२१२३४३५ तसेच १९१२ अशा तीन टोल फ्री क्रमांकाची सोय कंपनीने केली आहे. मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राद्वारे या क्रमांकावर २४ तास सेवा दिली जाते. याशिवाय ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन ०२२-५०८९७१०० या क्रमांकाला मिस कॉल केल्यानंतर सुद्धा वीजपुरवठा खंडित असल्याची तक्रार नोंदवली जाते किंवा NOPOWER <ग्राहक क्रमांक> हा संदेश ९९३०३९९३०३ या नंबरवर पाठवा. या पद्धतीचा वापर केल्यास ग्राहकाची तक्रार योग्य व्यक्तीपर्यंत व वेळेत पोहोचवून त्या वेळेत सोडवण्यास मदत होऊ शकते.
अपडेट्स मिळवा मोबाईलवर
मोबाईल क्रमांक नोंदणी केलेल्या ग्राहकांना खंडित वीजपुरवठा, वीजबिल व इतर माहिती SMS वर पाठविली जाते. त्यासाठी ग्राहकांनी स्वत:चा मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदविणे आवश्यक आहे. मोबाईल क्रमांक नोंदविण्यासाठी MREG_<12 अंकीग्राहक क्रमांक> (उदा. MREG 123456789012) असा संदेश टाईप करुन ९९३०३९९३०३ क्रमांकावर पाठवावा असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे.