बांधकाम कामगारांना तालुकानिहाय संचाचं वाटप !

Edited by: देवयानी वरसकर
Published on: July 06, 2024 07:16 AM
views 201  views

सिंधुदुर्गनगरी :  बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत नोंदीत जिवित (सक्रीय) बांधकाम कामगारांना सुरक्षा संच, अत्यावश्यक संच व गृह उपयोगी वस्तूसंच (भांडी वाटप) दि. 9 जुलै 2024 पासून तालुका निहाय संच वाटपाचे कार्यक्रम होणार असल्याची माहिती सरकारी कामगार अधिकारी संदेश आयरे यांनी दिली आहे. 


 मालवण दि. 9 ते 14 जुलै 2024 माम वरेरकर हॉल, मालवण 

 देवगड दि. 9 ते 14 जुलै 2024 खरेदी विक्री संघ गोडावून,  देवगड

कणकवली दि. 16 ते 21 जुलै 2024 नगरपरीषद हॉल, कणकवली 

सावंतवाडी दि. 16 ते 18 जुलै 2024 नगरपरिषद हॉल स्टँड समोर, सावंतवाडी 

कुडाळ दि. 23 ते 28 जुलै 2024 पंचायत समिती हॉल, कुडाळ 

वेंगुर्ला दि. 19 ते 20 जुलै 2024 साई मंगल कार्यालय, वेंगुर्ला 

दोडार्मार्ग दि. 21 जुलै 2024 स्वतंत्रपणे कळविण्यात येईल 

वैभववाडी दि. 21 जुलै 2024 स्वतंत्रपणे कळविण्यात येईल 


वरील नमूद केलेनुसार बांधकाम कामगारानी सकाळी 10 ते सायं. 6 वाजेपर्यंत संच वाटप होणार  आहे. तरी  तालुक्यातील बांधकाम कामगारांनी दिलेल्या तारखांनुसार संच वाटपाच्या ठिकाणी उपस्थित राहून संच प्राप्त करुन घ्यावे. सदरचे वस्तू संच हे निनामुल्य वाटप करण्यात येणार असून सदर वस्तू संच वाटपाच्या ठिकाणी गर्दी गोंधळ न करता संच प्राप्त करुन घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन सरकारी कामगार कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.