
देवगड : शासनाच्या १०० दिवसाच्या उपक्रमांतर्गत पंचायत समिती देवगड येथे संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षातील डॉ . बाबासाहेबांची जयंती आणि शासकीय अधिकारी कर्मचारी यांची संविधानिक जबाबदारी या विषयावर सडा शाळेचे शिक्षक सचिन जाधव सर यांनी मार्गदर्शन केले तर आनंद जाधव सर यांनी संविधान प्रस्ताविकेचे वाचन केले. हा कार्यक्रम पंचायत समिती देवगड गटविकास अधिकारी यादव मॅडम व सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमात सचिन जाधव यांनी संविधानाचा इतिहास आणि त्यांचे महत्त्व, अमृत महोत्सवाची प्रेरणा, आजच्या काळात बाबासाहेबांचे विचार का महत्वाचे, शासकीय कर्मचाऱ्यांची लोकसेवकांची संविधानिक जबाबदारी, आदर्श वर्तनासाठी काही प्रमुख बाबी, लोकसेवकांचा आदर्श डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टीकोन याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी पंचायत समिती देवगडचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.