भाजपा वेंगुर्लेच्यावतीने मठ - सिद्धार्थनगर इथं संविधान गौरव !

Edited by: दिपेश परब
Published on: November 27, 2023 18:18 PM
views 70  views

वेंगुर्ला : भारतीय राज्यघटना संविधान सभेने स्वीकारली, त्याला यावर्षी ७३ वर्षे पुर्ण होत आहेत. देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो.

  संविधानाची अनेक वैशिष्ट्य आहेत. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हे संविधानाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. संविधानाच्या अस्तित्वाचे कारणच हे तत्व आहे. यासोबतच धर्मनिरपेक्षता, संघराज्य प्रणाली, संसदीय लोकशाही, कार्यपालिका, न्यायपालिका व कायदे मंडळ यांच्या पायावर उभी असलेली लोकशाही, ही संविधानाची प्रमुख वैशिष्ट्य आहेत .

   भारत देश हा लोकशाही राष्ट्र म्हणून जगासमोर उभा आहे . हा लोकशाहीचा उस्तव पुढील हजारो वर्षे चालत रहाण्यासाठी राज्यघटना तिच्या पावित्र्यासह आणि उद्दिष्टांसह टिकली पाहिजे . लोकशाही टीकण्यासाठी संविधानाचे रक्षण होणे आवश्यक आहे , म्हणूनच भाजपाने " संविधान गौरव पंधरवडा " आयोजित केला असल्याचे राजन तेली यांनी सांगितले .

   भाजपा वेंगुर्लेच्यावतीने मठ - सिद्धार्थनगर येथील समाज मंदिरात  संविधान पुजन व वाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . यावेळी सर्वप्रथम महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सरपंच रुपाली नाईक व संविधानाच्या प्रतिमेस मा. आम.राजन तेली यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला . तसेच अनुसूचित जाती मोर्चाचे चंद्रकांत जाधव यांनी संविधानाचे वाचन करून शपथ घेतली .

     यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, वेंगुर्ला मंडल अध्यक्ष सुहास गवंडळकर, प्रदेश युवामोर्चा उपाध्यक्ष प्रथमेश तेली, मठ सरपंच रुपाली नाईक , उपसरपंच बंटी गावडे , सोसायटी चेअरमन सुभाष बोवलेकर, शक्तिकेंद्र प्रमुख विजय बोवलेकर, युवा मोर्चाचे अजित नाईक, प्रशांत बोवलेकर, ग्रा.पं.सदस्य संतोष वायंगणकर, समिक्षा धुरी, सोनिया मठकर, सिद्धी गावडे, उमेश मठकर, सुरेश मठकर, प्रशांत मठकर, संजय मठकर, अनिकेत जाधव, दामोदर मठकर उपस्थित होते.