
सावंतवाडी : कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय मध्ये आज 26 नोव्हेंबरला माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांच्या मदतीने संविधान दिन साजरा करताना भारताचा नकाशा याची प्रतिकृती विद्यार्थ्यांच्या मदतीने साकारण्यात आली. ही अनोखी संकल्पना शिक्षकांच्या मदतीनेच साकारण्यात आली. यावेळी प्रशालेतील कलाशिक्षक केदार टेमकर तसेच क्रीडा शिक्षिका अल्मेडा चतुर्थवर्ग कर्मचारी सदानंद जाधव तसेच प्रशालेतील शिक्षक वृंद यांनी या कामी मदत केली.
सुरुवातीला परिपाठाच्या दरम्यान संविधानाचे सर्व विद्यार्थ्यांनी सामूहिक पठण केले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक एस व्ही भुरे यांनी प्रस्ताविकातून संविधान दिन का साजरा केला जातो याची माहिती दिली तसेच सर्वांना या दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
संविधान दिनाच्या औचित्य साधून घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेमध्ये दूर्वा केसरकर, सानवी सावंत, निष्का नार्वेकर, अनुराग ठाकूर, आर्यन जाधव, पियुष शिर्के, राजदीप बांदेलकर या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
प्रशालेतील शिक्षिका मयुरी मनीष कदम यांनी संविधान व त्याचे महत्त्व विशद केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन एस जी सामंत यांनी मांडले.
यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे पर्यवेक्षक एस एस वराडकर, एस एस चव्हाण, एस जी सामंत, एस पी कुलकर्णी, एम आर घाटवळ, कलाशिक्षक केदार टेमकर उपस्थित होते.










