यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये संविधान दिन

Edited by: विनायक गांवस
Published on: November 27, 2025 15:53 PM
views 52  views

सावंतवाडी : यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये “हमारा संविधान – हमारा स्वाभिमान” या संकल्पनेवर आधारित संविधान दिन काल उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात देशाच्या संविधानातील प्रस्तावनेच्या वाचनाने झाली. विद्यार्थ्यांनी न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या भारतीय राज्यघटनेतील मूलभूत मूल्यांवर प्रभावी भाषणे सादर केली.

यावेळी संविधानावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा सुद्धा घेण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक या नात्याने ऍड.सायली सावंत उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानातील महत्त्वाच्या तरतुदींबाबत मार्गदर्शन केले. शाळेच्या अध्यक्षा ऍड.अस्मिता सावंतभोसले यांनी विद्यार्थ्यांना राज्यघटनेतील मूल्ये आचरणात आणण्याचे आवाहन केले. यावेळी मुख्याध्यापिका प्रियांका डिसोझा व शिक्षक वर्ग उपस्थित होता.