
सावंतवाडी : सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी यांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान वनविभागाच्या विविध विषयांवर तसेच वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान वन्यप्राण्यांची गणना आदींबाबत चर्चा झाली. सावंतवाडी वनविभागात रिक्त असलेले उपवनसंरक्षक पद तात्काळ भरण्याची मागणी आमदार नितेश राणे यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. यावेळी नितेश राणे यांनी तातडीने उपवनसंरक्षक मिळण्याची का गरज आहे, याबाबतचे सविस्तर पत्रही मंत्री मुनगंटीवार यांना सादर केले होते. त्यानंतर नवलकिशोर रेड्डी यांची उपवनसंरक्षक पदी नियुक्ती करण्यात आली होती. याच अनुषंगाने रेड्डी यांनी आमदार राणे यांची सदिच्छा भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली.