आंबोलीच्या विकासासाठी राणेंना विजयी करा : दीपक केसरकर

Edited by: विनायक गांवस
Published on: April 28, 2024 05:05 AM
views 245  views

सावंतवाडी : आंबोली कबुदलातदार गावकर सारखा प्रश्न सुटल्यात जमा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या भागाच्या विकासासाठी जनतेने महायुती सोबत रहावं, महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्यांंन निवडून द्यावं असं आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलं. येथील प्रचार सभेत ते बोलत होते.

ते म्हणाले, जिल्हा आणि देश प्रगतीपथावर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणे गरजेचे आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठ मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी केले. राज्य व केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत पर्यंत पोहोचल्या आहेत. आंबोली कबुदलातदार गावकर सारखा प्रश्न सुटल्यात जमा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या भागाच्या विकासासाठी जनतेने महायुती सोबत रहावे असे त्यांनी सांगितले. तर सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सिंधुरत्न योजनेतून ग्रामीण कृषी पर्यटन, कुक्कुटपालन, शेळीपालन, गोपालन अशा विविध योजनांची अंमलबजावणी होत आहे. काजू-बी ला प्रतिकीलो हमीभ मिळावा म्हणून प्रयत्न केले आहेत. स्वाभिमान हा सावंतवाडीचा केंद्र बिंदू आहे. आपली संस्कृती विकासाची आहे. आंबोलीमध्ये पर्यटनदृष्ट्या विविध प्रकल्प मंजूर केले आहेत. त्यामुळे महायुती सरकारला जनता निश्चितच पाठिंबा देईल असा विश्वास याप्रसंगी त्यांनी व्यक्त केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी,  उपतालुकाप्रमुख राघोजी सावंत, आंबोली सरपंच सावित्री पालेकर, महिला जिल्हाध्यक्षा अँड निता सावंत कविटकर, दिनेश गावडे, विनायक दळवी, रूपेश पावसकर, तालुकाप्रमुख नारायण राणे, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, गुंड जाधव, हनुमंत सावंत, संदेश गुरव व मान्यवर उपस्थित होते.