
सावंतवाडी : सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीची सभा संपन्न झाली. या सभेमध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीची उमेदवारी विलास गावडे यांना मिळावी असा एकमुखी ठराव सर्वानुमते सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, उबाठा शिवसेनेनंतर कॉंग्रेसने ठराव घेतल्यान महाविकास आघाडीत उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.
तसेच नवीन मतदार नाव नोंदणी बाबत आढावा, सरकार विरोधात मागील तीन महिन्यात होणाऱ्या आंदोलनाबाबत आढावा व नियोजन सोशल इंजीनियरिंग बूथ कमिटी व बीएलए वर पक्ष बांधणी संदर्भात आढावा घेण्यात आला. यावेळी सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी इनसुलीतील शिवा सोमा गावडे तर तांबोळी पंचायत समिती मतदार संघाच्या अध्यक्षपदी भाऊसाहेब विश्वासराव देसाई यांची नियुक्ती करण्यात आली.
या सभेला जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, कार्याध्यक्ष विलास गावडे, तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, जिल्हा सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर, शहराध्यक्ष ऍड. राघवेंद्र नार्वेकर, ऍड संभाजी सावंत, आनंद परुळेकर, रुपेश आईर, राजू मसुरकर, बाळासाहेब नंदीहाळी, संतोष सावंत अरुण नाईक, संजय गावकर, विभावरी सुकी, आमिधी मेस्त्री, अभय मालवणकर, माया चिटणीस, हरिश्चंद्र मांजरेकर, स्मिता वागळे, अन्वर खान, सुमेध सावंत, प्रतीक्षा भिसे, अरुण भिसे, बासिफ पडवेकर, रमेश चव्हाण, कौस्तुभ पेडणेकर, गणपत मांजरेकर, राजेंद्र सावंत, संजय लाड, पवन बनवे, राहुल कदम, रणजीत माने, रणजीत सांघले, रविराज पेडणेकर, समीर भाट, लक्ष्मण भुते, संदीप सुकी, मधुकर जाधव, समीर वंजारी, संजय गावकर, चौरंगनाथ सावंत इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.