संभाजी भिडेंचा वैभववाडीत काॅग्रेसकडून निषेध

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 31, 2023 19:32 PM
views 167  views

वैभववाडी : राष्रटपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणा-या संभाजी भिडेंचा वैभववाडीत राष्ट्रीय काँग्रेसकडून आज ता ३१ रोजी निषेध करण्यात आला. भिडे यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.

संभाजी भिडे यांनी दोन दिवसांपूर्वी महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत.राज्यात या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस आक्रमक झाली आहे. भिंडेच्या त्या विधानाचा निषेध करण्यात येत आहे. वैभववाडीतही आज काॅग्रेसतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. येथील संभाजी चौकात भिडे यांच्या प्रतिमेला काळे फासून जोडे मारण्यात आली. तसेच निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.यावेळी तालुका अध्यक्ष  दादामिया पाटणकर,  जिल्हा अध्यक्ष रोजगार व स्वयंरोजगार विभाग गुलजार काझी,  जिल्हा सचिव मीनाताई बोडके,  तालुका महिला अध्यक्ष प्रांजली जाधव, तालुका सेवादल अध्यक्ष अशोक राणे, सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष प्रकाश जाधव, तालुका उपाध्यक्ष वसंत नाटेकर, अहमद बोबडे, वासिम काझी, मुरादआली ठाणगे, दस्तगीर नाचरे, मुस्ताकिन पाटणकर व अशोक कांबळे इत्यादि कार्य करते उपस्थित होते.